जळगाव : प्रतिनिधी
गेल्या महिनाभरपसून दडी मारून बसलेले पाऊस गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शेतातील पिकांसह धरणातील पाणीसाठ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. हेजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठयात एका टक्क्याने वाढ झाली आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारली त्यामुळे तब्बल एक महिना पाऊस नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे. जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमधे साठा शून्यावर आहे. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे यंदा भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्याची श्यकता आहे. बुधवारी रात्री पावसाचे आगमन झाल्याने जळगाव जिल्ह्यात पाणीसाठा सोबत पिकांना देखील त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
टंचाई आराखडा सादर करण्याचे आदेश
राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शासनाने जिल्हानिहाय पाणीटंचाईचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे.
अजून पावसाची अपेक्षा
जिल्ह्यात १० तारखेपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस अजून चांगला पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह सर्वांकडून होत आहे.