सोलापूर : वृत्तसंस्था
अनेक परिवारात सासू – सुनेचे भांडण होत असतात पण काही भांडण काही काळासाठी असतात तर काही भांडण इतक्या टोकाला पोहचते कि काही होवू शकते अशीच एक घटना सोलापुरात घडली आहे. न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून पतीने हात पकडला आणि सासूने ब्लेडने तिच्या हातावर वार करून जखमी केल्याची घटना विडी घरकुल येथे घडली.
स्नेहा गिरीधर टंकसाळ या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार सासू सरस्वती रामचंद्र टंकसाळ व पती गिरीधर रामचंद्र टंकसाळ या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी स्नेहा ही सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कार्यक्रमाला गेली होती. यावरून सासूने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर स्नेहाला तिचा पती गिरीधर याच्यासमोर उभे करून विचारणा केली. पतीनेही यावरुन मारहाण केली.