चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीच्या गस्त गुन्हे शोध पथकाने चंदन चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यासोबतच कुन्हाड आणि करवतही जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री सहायक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी आणि पथक गस्त घालत होते.
पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास भडगाव रस्त्यावर दोन संशयित इसम आढळून आले. त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्या दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना शिवाजी चौकात पकडले. त्यांच्याकडे तीन किलो चंदन आढळून आले. य आरोपींवर चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल आहे. यात शेख अमीन शेख हजी (वय ५२) आणि अशोक लक्ष्मण आव्हाड (वय ४५, दोघे रा. हस्ता, ता कन्नड) यांना अटक करण्यात आल आहे. ही कारवाई पोलिस नाईक महेंद्र पाटील, भूषण पाटील, विजय पाटील समाधान पाटील, पवन पाटील, राके महाजन, आशुतोष सोनवणे, रवींद्र यच्छे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केली आहे. पुढील तपास महेंद्र पाटील व पोक विजय पाटील हे करीत आहेत.