जळगाव : प्रतिनिधी
पाचोरा शहरातील एका भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून आक्षेपार्ह फोटो तयार करत तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी बनावट खाते वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणी ही पाचोरा शहरातील एका भागात वास्तव्याला आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्त्तीने ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामची दोन बनावट खाती तयार करून पीडित तरुणीचा फोटो ठेवून त्यावर वेगळ्याच प्रकारचे स्टिकर लावले. त्यानंतर तिची बदनामी होईल, या उद्देशाने सोशल मीडियात व्हायरल केले. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार पीडित तरुणीसह तिच्या नातेवाईकांनी बुधवारी दुपारी १ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात येत तक्रार दिली. त्यानुसार तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते बनविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात न्हा दाखल केला आहे.