चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस, तसेच त्यास मदत करणाऱ्या मित्रास चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ३१ रोजी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले होते. शुभम संजय मोरे (२२, चाळीसगाव) याने या मुलीस पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुभमला या गुन्ह्यात मित्र राहुल जगन सुतार (सूरत) याने मदत केली आहे. राहुल सुतार यास ताब्यात घेण्यात आले.
यांनी केली कारवाई
पोहेकॉ. राहुल सोनवणे, पोकों. आशुतोष सोनवणे, पोकॉ. रवींद्र वच्छे पोकॉ. उज्ज्वल म्हस्के यांनी राहुल यास विश्वासात घेतले असता, शुभम हा मुलीसोबत सूरत येथे आला होता. त्यास लपण्यासाठी भाड्याने रूम उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सूरत येथे जाऊन आरोपी शुभम मोरे व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले.


