चंदिगढ वृत्तसंस्था: हरियाणातील संपत येथे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद होत होते याच चरित्र संशयातून पतीने पत्नीवर तीस वार करून पत्नीचा खून केला याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणातील सोनीपत शहरात तारानगर येथे पती शत्रुघ्न व पत्नी पूनम राहत होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं त्याला वाटत होतं, यावरून त्यांच्यात वारंवार वादही व्हायचे. घटनेच्या दिवशीही याच संशयातून त्याने आधी पत्नीशी भांडण केले. त्यानंतर पूनमच्या अंगावर धारदार चाकूने जवळपास 30 वेळा वार केले. यामुळे पूनमचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे,मृत पूनमचे वडील भगवान दास यांच्या जबाबावरून पोलिसांनी शत्रुघ्नविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.