मुंबई : वृत्तसंस्था
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे आपल्या घरी सुट्टीसाठी आलेल्या मुंबईतील पोलिसाचा दुर्देवी अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे. यात दीपक जयसिंग बाविस्कर (वय ३२) असे मयत पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दीपक बाविस्कर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते व ते मुंबई येथे रेल्वे पोलिसात नियुक्तीस होते. दीपक बाविस्कर हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी आल्यानंतर . सोमवारी रात्री दिपक बाविस्कर हे कामाच्या निमित्ताने दुचाकीने वावडदा येथे गेले होते. तेथील काम आटोपून परत घरी म्हसावदरोडवरील कुरकुरे नाल्याजवळ त्यांचया वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वाहनाने दिलेली धडक इतकी जोरात होती की, या अपघातात दीपक यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना त्याठिकाणाहून जाणार्या वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करीत दीपक बाविस्कर यांना मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.


