• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भर रेल्वेस्थानकावर महिला वकीला सोबत अश्लील कृत्य !

editor desk by editor desk
September 6, 2023
in क्राईम
0
भर रेल्वेस्थानकावर महिला वकीला सोबत अश्लील कृत्य !

मुंबई : वृत्तसंस्था

 

मुंबईतील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून सध्या लोकल प्रवासही आता फारसा सुरक्षित राहिलेला नसल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. असाच एक प्रकार रेल्वे स्टेशनवर घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्टेशनवर असाच काहीसा प्रकार घडला. तेथे एका महिलेचा विनयभंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून आरोपीविरोधात कलम 354 व कलम 509 अंतर्गत कुर्ला रेल्वे पोलिस स्थानकांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरफान सिद्दीकी (वय 39) असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास एक महिला वकील घाटकोपर येथून ट्रेनने विद्याविहार येथे आली. ती ब्रीजचा जिना चढत असताना, आरोपी जिना उतरू खाली येत होता. तो अचानक पीडित महिलेच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिच्याकडे अश्लील नजरेने पाहत त्याने तिचा थेट हातच धरला. ती महिला एक क्षण भांबावली पण दुसऱ्याच क्षणी तिने आरडाओरडा सुरू केला आणि स्टेशनवर गस्त घालणाऱ्या पोलिसांना मदतीसाठी हाक मारली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला पकडले.

त्यानंतर पीडित महिलेने कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ” गुन्हे टाळण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलिस उपस्थित असतात. विशेषत: महिलांच्या डब्याजवळ, होमगार्ड किंवा GRP कर्मचारी गस्त घालत असतात. त्यांना अधिकाऱ्यांतर्फे सतत मार्गदर्श केले जाते. या घटनेत पीडित महिलेचा आवाज ऐकून पोलिसांचे लक्ष वेधले गेले, त्यांनी तातडीने आरोपीचा पाठलाग करत त्याला रंगेहाथ अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags: #policeCrimerailway
Previous Post

गाडीचा कट लागला अन दोघांनी त्याला लुटलं !

Next Post

सुट्टीसाठी पोलीस आला घरी अन घडल ते धक्कादायक !

Next Post
सुट्टीसाठी पोलीस आला घरी अन घडल ते धक्कादायक !

सुट्टीसाठी पोलीस आला घरी अन घडल ते धक्कादायक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group