लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वाढीव वीज बिल, वीज कनेक्शन तोडणे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र भरात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे शहरातील नवीन बसस्थानकाच्या आवारात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, महावितरण कंपनीने ग्राहकांना वाढीव वीज बिल देणे रीडिंग वेळेवर न घेणे, वाढीव वीज बिलापोटी लोकांचे वीज मीटर काढून घेणे, शेतकऱ्यांना रोहित्र जळाल्यानंतर महिना महिनाभर बसवून दिले जात नाही, तसेच या दिवाळीपासून महाराष्ट्रभरातील एसटी कर्मचारी खाजगीकरणाचा विरोध करून शासनात विलिनीकरणाची मागणी करत आहे.
त्याप्रमाणे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची कोणतेही सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळी दखल घेताना दिसत नाही. याउलट परिवहन मंत्री वेळोवेळी हायकोर्टाचा दाखला देत एसटी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अलीकडेच पूर्ण खाजगीकरण केले जाईल असा इशारा दिला गेला आहे परंतु एसटी कर्मचाऱ्यांसोबत बहुजन मुक्ती पार्टी सदैव खंबीरपणे पाठीशी उभी आहे यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरील आदेश आल्यानंतर आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा देण्यात आला होता. परंतू शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज शनिवार २० नोव्हेंबर रोजी नवीन बसस्थानकाच्या आवारात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
या निवेदनावर बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, खान्देश प्रभारी सुमित्र अहिरे, देवानंद निकम, सुकलाल पेंढारकर, देवसिंग पावरा, शेवला पावरा, शेख मुजम्मील, विनोद अडकमोल, नागराज ढिवरे, गेमा बारेला, राजेंद्र खडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.