मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना देखील अनेक गुन्हेगार तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतांना देखील पकडले जात आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी गुन्हेगारांकडून नवनवीन युक्त्या लढविल्या जात असून शारजाहून आलेल्या एका प्रवाशाने सोबत आणलेल्या मिक्सरच्या भांड्यात तब्बल १ किलो सोने लपविले होते. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
शारजाहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीनंतर विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याने परदेशातून येताना पास्ता बनविण्याचे भांडे तसेच नवा मिक्सर ग्राइंडर याची खरेदी केली होती. अधिकाऱ्यांनी त्याच्या इतर सामानासह ज्यावेळी मिक्सरचा बॉक्स उघडला त्यावेळी त्यामध्ये १ किलो ३० ग्रॅम सोने लपविल्याचे आढळून आले.