जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात नुकतीच एसीबीच्या कारवाईची घटना ताजी असताना आज देखील दोन जणांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक भीभमराव लहू नाईक (55) व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल (34) यांना शेळी पालनासाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर दुसर्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच मंगळवारी दुपारी अटक केली आहे.
जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या कार्यालयाकडे यावल तालुक्यातील बोरावल येथील ४२ वर्षीय तक्रारदाराने शेळी पालन साठी एक लाख रुपयांचे कर्जाचे प्रकरण दाखल केले. त्यापैकी पहिला हप्ता 75 हजार रुपयांचा मंजूर झाला व उर्वरीत 25 हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक यांनी स्वतःसाठी तीन हजार व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल यांच्यासाठी दोन हजारांची लाच सोमवारी मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला व कार्यालयातच संशयितांना लाच घेताच अटक करण्यात आली. संशयितांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकुर, राकेश दुसाने यांच्यासह पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.