साक्षीदार | ५ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक शेतकरी ऊसाची मोठी लागवड करीत असतात पण एक शेतात गांजाची लागवड करीत असल्याचं उघड झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. त्याचबरोबर अशा शेतकऱ्यांच्यावरती कारवाई सुध्दा झाली आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात या आगोदर अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी कारवाई सुध्दा केली आहे. काल जत तालुक्यातील एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याचं उजेडात आलं आहे. ज्यावेळी पोलिसांनी सगळा परिसर तपासून पाहिला त्यावेळी त्यांना तब्बल 20 किलो गांजा शेतात सापडला आहे. सापडलेल्या गांजाची किंमत अंदाजे किंमत साडे पाच लाख रुपये असल्याची माहिती सांगली पोलिसांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज या गावात उसाच्या शेतात शेतकऱ्यांनी गांजाची लागवड केली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी त्यांना उसाच्या शेतातून तब्बल वीस किलो ओला गांजा सापडला. त्याची अंदाजे किंमत साडे पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी शेतकरी बाबू पांडुरंग खरात यांना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या संपूर्ण शिवाराची पोलिस चौकशी करीत आहेत. पोलिसांना माहिती मिळाली की बाज येथील शेतकऱ्याने आपल्या उसाच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावली आहेत. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी त्यांना उसाच्या शेतामध्ये तब्बल 20 किलोची गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरापर्यंत बाबू खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत. त्या परिसरात आणखी काही शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने लागवड केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिस ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची कसून चौकशी करीत आहेत.