नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अनेकांना दारूचे व्यसन लागले असते पण काही लोक या व्यसनामध्ये काय करून टाकतील हे कुणीही सांगू शकत नाही. दारूपायी आणखी एक कुटुंब उध्वस्त झाल्याची धक्कादायक घडल्याचे उघडकीस आले आहे. तेथे एका नातवाने दारूच्या नादात असं कृत्य केलं जे ऐकून सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. अख्खं गावचं हादरलं.
ही दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोली गावातील आहे. तेथे दारूच्या आहारी गेलेल्या तरूणाने जे कृत्य केले ते ऐकून साऱ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. दारूच्या नादात त्या तरूणाने त्याच्या वयोवृद्ध आजोबांना मारहाण केली. आई आणि पत्नीला घरात लपवून का ठेवलं, असा प्रश्न विचारत त्याने आजोबांना बेदम चोप दिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्याच आजोबांचा गळा दाबला आणि त्यांचा जीवही घेतला.
यशवंत माधो कापगते असे मृत पावलेल्या आजोबांचे नाव आहे. ते 67 वर्षांचे होते. तर रोशन अशोक कापगते असे आरोपी नातवाचे नाव असून तो अवघ्या 26 वर्षांचा आहे. दारूच्या नादात त्याने आजोबांचा जीव घेतला, त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आणि हत्या केल्याने आरोपीचेही संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखला झाले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.