जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात तब्बल तीन वेळा आमदारकी भूषविणारा भाजप नेता बी.एस.पाटील आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर शरद पवार आज आलेले आहेत. त्यांची जळगावात आज सभा सुरु झालेली होती. यावेळी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते बी.एस.पाटील यांचा पक्ष सोहळा संपन्न झाला.
खान्देशातील मोठं नाव असलेले बी.एस.पाटील असून ते तीनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांना 2009 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते स्वगृही भाजपात परतले होते. बी एस पाटील हे 2019 मध्ये चर्चेत आले होते. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात वाद उफाळला होता. विशेष म्हणजे अमळनेरला एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उदय वाघ यांच्या समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली होती. यावेळी मंचावर मंत्री गिरीश महाजन हे देखील होते.