हिंगोली : वृत्तसंस्था
राज्यातील महामार्गावर अपघाताची संख्या वाढत असतांना आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी शिवारात भरधाव कार दुभाजकावर आदळून रविवारी सकाळी अपघात झाला. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कावरखे कुटुंबीय कारने नांदेडहून हिंगोलीकडे येत होते. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आढळली व चार ते पाच वेळा उलटली. यामध्ये प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे (वय ६५), मंजूषा जयप्रकाश कावरखे (वय ६०) हे दोघे जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा पराग हा गंभीर जखमी झाला. त्यास कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे.


