चाळीसगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत चाळीसगाव शहरातील तक्रारदाराची जमीन भाड्याने घेवून त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती राहत्या घरात स्वीकारताना चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी देवराम किसन लांडे (शशिकला नगर, चाळीसगाव) यास सोमवारी दुपारी 12 वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी लाचखोर अधिकारी लांडे यास शशिकला नगरातील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या.