यावल : प्रतिनिधी
२१ वर्षीय विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज उघडकीस आली आहे. हि घटना यावल तालुक्यातील परसाडे गावात घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत तरुणी संजना आमीन तडवी हीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रविवार रोजी संजना या विवाहित तरुणीने सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना आपल्या राहत्या घरात एकटी असताना छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी विवाहितेच्या मृतदेहाचे शिवविच्छेदन केले.


