नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना शुक्रवारी देखील अशीच घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या पती आणि तीन मुलांची हत्या केली आहे. त्याचबरोबर ती महिला रात्रीत घटनास्थळावरुन गायब झाली आहे. ती महिला घरातून बाहेर जाताना दरवाजा बंद करुन गेली. ज्यावेळी शनिवारी ही घटना लोकांना समजली, त्यावेळी शेजारी आणि स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. नवरा नको त्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी केली आहे. तिथल्या एका व्यक्तीने पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांना शंका आहे की, पत्नीने प्रियकराच्या मदतीने हे कांड केलं आहे. पोलिसांनी चारही मृतहेद शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. आरोपी महिलेच्या शोधात पोलिस आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी त्या महिलेच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ज्यावेळी नातेवाईक उठले, त्यावेळी नवरा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांची मुलं घरात बेशुध्द अवस्थेत आढळून आली, पोलिसांना शंका आहे की, चौघांना त्या महिलेने विष जेवणात घालून मारले आहे.
हा संपूर्ण घटनाक्रम हरियाणा राज्यातील नूंह जिल्ह्यातील रोजकामेव परिसरातील आहे. पतीचं नाव जीत सिंह, मुलाचं नाव खिलाड़ी उम्र 12, मुलगी राधिका 10, प्रियांशु वय ७ या सगळ्यांना संपवणारी महिला फरार आहे. त्या महिलेचं नाव मीना असं आहे. शेजारच्या लोकांनी सांगितलं की, महिलेवरती पतीला शंका होती. या प्रकरणामुळे दोघांच्यात अनेकदा वाद सुध्दा झाला आहे. पत्नी काय दोन ते चार दिवसांसाठी गायब व्हायची. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची तक्रार तिच्या नवऱ्याने माहेरी केली होती. त्यानंतर सुध्दा त्या महिलेमध्ये कसल्याही प्रकारचा सुधार झाला नाही. पोलिसांनी त्या महिलेला शोधण्यासाठी एक पथक तयार केलं आहे.


