• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळ हत्याकांडातील तिसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

editor desk by editor desk
September 3, 2023
in क्राईम
0
भुसावळ हत्याकांडातील तिसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी 

 

भुसावळ तालुक्यात कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परीसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळील चौकात घडली होती. या घटनेत या रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) हे व विकी साळुंखे (30) हे जखमी झाले होते तर त्यातील रमेश इंगळे यांचा उपचार सुरू असताना गोदावरी रुग्णालयात रविवारी पहाटे तीन वाजता मृत्यू झाला. खून प्रकरणी विकास साळुंखे यांच्या फिर्यादीवरून दीपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे, अमोल कोळी, मयूर कोळी, देवी भील, किरण सपकाळे व अन्य चार अनोळखींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, खून प्रकरणी दीपक छगन तायडे व मनोज श्रावण मोरे व किरण सपकाळे (तिन्ही रा.कंडारी, ता.भुसावळ)) या तीन संशयितांना अटक करण्यात आली.

खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Tags: #policeBhusawalCrime
Previous Post

महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारे वाळूमाफिया पोलिसांच्या ताब्यात !

Next Post

पवारांचे मंत्री अनिल पाटलांच्या निवासस्थानावर शेकडोच्या संख्येने धडकला मोर्चा !

Next Post
पवारांचे मंत्री अनिल पाटलांच्या निवासस्थानावर शेकडोच्या संख्येने धडकला मोर्चा !

पवारांचे मंत्री अनिल पाटलांच्या निवासस्थानावर शेकडोच्या संख्येने धडकला मोर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group