मुंबई : वृत्तसंस्था
लग्न करण्यासाठी अनेक तरुण तरुणी जीवनसाथी मॅट्रीमोनी या साईटवरून लग्न जमवून घेत असतात पण एका मुलाने एका मुलीसोबत मैत्री करून महिनाभर चॅटिंगही झाली. मुलाने मी लंडनला असून, दिल्लीमधील कस्टम ऑफिसमध्ये माझी बॅग अडकली आहे. ती सोडविण्यासाठी दीड लाख रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार जुलै २०२१ मध्ये घडला. त्यानंतर अंबाजोगाईच्या डॉक्टर मुलीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी यात तांत्रिक तपास करून दीड लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. तक्रार आल्यानंतर दोन वर्षे रक्कम थांबविली होती. परंतु, आता न्यायालयाच्या आदेशाने हे पैसे खात्यावर वर्ग केले आहेत.
अंबाजोगाईतील एक मुलगी मुंबईत वैद्यकीय अधिकारी आहे. जून महिन्यात तिची जीवनसाथी मॅट्रीमोनी या साइटवर राहुल चांदेकर या मुलासोबत ओळख झाली. त्यांच्यांत महिनाभर चॅटिंग झाले. त्यामुळे चांगलीच मैत्री झाली.राहुलने मी लंडनला असून, माझी बॅग दिल्लीतील कस्टम ऑफिसमध्ये अडकली आहे. मी भारतात आल्यावर तुझ्याकडून बॅग घेईन आणि तुझे पैसे तुला देईन, असे सांगत डॉक्टर मुलीकडून तब्बल दीड लाख रुपये उकळले. त्यानंतर राहुलने प्रतिसाद दिला नाही. यावर आपली फसवणूक झाल्याचे समजताच डॉक्टर मुलीने बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. हा प्रकार जून ते सप्टेंबर २०२१ या काळात घडला होता.