• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळच्या खुनात शालक निघाला मारेकरी !

editor desk by editor desk
September 2, 2023
in क्राईम
0
भुसावळच्या खुनात शालक निघाला मारेकरी !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळात एकामागोमाग तीन खुनाच्या घटना एकाच दिवसात घडल्याने शहरासह जिल्हा हादरला होता. त्यातील पहाटेच्या सुमारास एका कुविख्यात गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत सकाळी १० वाजेच्या सुमारास मयताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहोत. या खुनातील आरोपीला बाजार पेठ पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून पुढील चौकशी सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वांजोळा रोड परिसरातील दत्तनगरातील रहिवासी सुरेश पांडु शिंदे, (वय-६८) यांनी आज पहाटे बाजार पेठ पोलीसात फिर्याद दिल्यानुसार दि. २ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निवृतीनगर येथील काशी विश्वेवर मंदरा समोरील नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या सिमेंटच्या टाकीच्या टेरेसवर त्यांचा मुलगा निखील सुरेश राजपुत [ पाटील ], वय २९ वर्षे हा झोपण्यास गेलेला होता. यातील संशयित आरोपी निलेश चंद्रकांत ठाकुर, (वय २२) हा मयताची पत्नीचा भाऊ आहे. यातील मयत याने दुस-या बाईसोबत प्रेमसंबध ठेवल्याने मयत हा त्याची पत्नीशी नेहमी भांडण करीत होता. त्याचा मनात राग ठेवुन आरोपीताने चाकु सारख्या धारदार शस्त्राने मयताचे गळ्यावर, छातीवर वार करुन गंभीर दुखापत करून जिवे ठार केले. त्यावरुन बाजारपेठ पोलीस स्टेशनला मयताचे वडीलांनी आरोपीताचे विरुध्द फिर्याद दिलेवरुन गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शना नुसार सपोनि.हरिष भोये यांनी केला असुन काही तासातच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ रमण सुरळकर, पोहेकॉ निलेश चौधरी, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोहेकॉ यासीन सत्तार पिंजारी, पोहेकॉ महेश चौधरी, पोकॉ योगश माळी, पोकॉ सचिन चौधरी, पोकॉ जावेद शहा, पोकॉ प्रशांत सोनार, पोकॉ योगेश महाजन, पोना दिनेश कापडणे, पोकॉ. अमर आढाळे यांचे मदतनीने आरोपीतास लागलीच ताब्यात घेवुन अटक केली आहे. यातील मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Tags: #policeBhusawalCrime
Previous Post

जळगावातून आणखी एक गुन्हेगार स्थानबद्ध !

Next Post

लग्न जमविण्यासाठी साईटवर बोलू लागली पण महिन्या भराने समजल्यावर बसला धक्का !

Next Post
लग्न जमविण्यासाठी साईटवर बोलू लागली पण महिन्या भराने समजल्यावर बसला धक्का !

लग्न जमविण्यासाठी साईटवर बोलू लागली पण महिन्या भराने समजल्यावर बसला धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group