• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात प्रथमच जळगावच्या महिलेवर स्थान बद्धतेची कारवाई !

editor desk by editor desk
September 2, 2023
in क्राईम
0
राज्यात प्रथमच जळगावच्या महिलेवर स्थान बद्धतेची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी 

 

महाराष्ट्रातून पहिल्यांदाच महिलेला एमपीडीए अंतर्गत कारवाई जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका महिलेला स्थानबद्ध केल्याची कारवाई करण्यात आली आहे. याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले असून यात धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (वय-५०) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे स्थानबद्ध केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात जानुबाई उर्फ धन्नू यशवंत नेटलेकर या महिला बेकादेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून हरीविठ्ठल नगर परिसरात विक्री करत आहे. त्यामुळे या परिसरातील तरुण पिढी ही व्यसनाधीन होत असल्याचे समोर आले आहे. तिच्यावरती अद्यापपर्यंत रामानंद नगर पोलिसांनी अनेक कारवाया केल्या. तरी पण तिच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. या अनुषंगाने रामानंदनगर जानुबाई नेटलेकरच्या विरोधात एमपीडिए कारवाई अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा अहवाल रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविला. दरम्यान ही महिला गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टीची मदत घेऊन दारूची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी संशयित महिला गुन्हेगार धनुबाई उर्फ धन्नू यशवंत नेतलेकर (वय 50) या महिलेला अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान महिलेवर स्थानबद्धतेची ही कारवाई पहिल्यांदाच असून ही घटना महाराष्ट्र राज्यातून पहिलीच असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील इरफान मलिक महिला पोलीस राजश्री पवार यांचे सह आदींनी कारवाई केली आहे.

Tags: #jalgaon#policeCrime
Previous Post

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राज्यातील बससेवा विस्कळीत !

Next Post

जळगावातून आणखी एक गुन्हेगार स्थानबद्ध !

Next Post
जळगावातून आणखी एक गुन्हेगार स्थानबद्ध !

जळगावातून आणखी एक गुन्हेगार स्थानबद्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group