Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गरोदर पत्नीला गावात काढली निर्वस्त्र धिंड !
    क्राईम

    गरोदर पत्नीला गावात काढली निर्वस्त्र धिंड !

    editor deskBy editor deskSeptember 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    प्रत्येकाच्या आयुष्यात पती-पत्नीचे नाते खूप महत्वाचे मानले जात पण याच नात्याला काळिमा फासणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. गरोदर पत्नीला निर्वस्त्र करून गावात तिची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, आरोपींना तात्काळ तुरुंगात टाकले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली. ही घटना ४ ते ५ दिवसांपूर्वीची असल्याचं समजतंय. पीडित महिला आदिवासीबहुल भागात राहते.

    पतीने आणि सासरच्या मंडळींनी पीडितेला बेदम मारहाण केली. ते इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तिला विवस्त्र केलं. गावातून तिची धिंड काढली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात पोहचून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण देशातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

    राज्याचे पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी घडली. धारियावाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला. शुक्रवारी संध्याकाळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक आणि एसएचओ तात्काळ घटनास्थळी पोहोचले, अशी माहितीही त्यांनी दिली. पीडित महिलेचे लग्न वर्षभरापूर्वी झाले होते. पण गावातीलच अन्य व्यक्तीसोबत ती राहत होती, असा आरोप पती आणि सासरच्या मंडळींनी केला. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी निषेध व्यक्त करतानाच, आरोपींना शक्य तितक्या लवकर तुरुंगात टाकले जाईल, असे ते म्हणाले.

    #police Crime Rajsthan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बसस्थानकात ‘हातचलाखी’ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हद्दपार आरोपी पुन्हा गुन्ह्यात

    March 27, 2026

    जळगावात मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश :दोन आरोपी गजाआड !

    March 27, 2026

    लॉकडाऊनच्या अफवा फेटाळल्या; केंद्राचा स्पष्ट इशारा :‘देश पूर्णपणे नियंत्रणात!’”

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.