जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील एका गावात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या संशयिताला जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. संशयिताकडून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. हर्षल विनोद राजपूत असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. संशयिताविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, अनिल जाधव, नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रितम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, उमेश गोसावी, लोकेश माळी, अशोक पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी आदींनी गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली.