पाटणा वृत्तसंस्था: बिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आली आहे. अल्पवयीन प्रेम युगल एकांतात बसलेले पाहून काही नराधमांनी पोलिस असल्याचा बनाव करून त्यांचे फोटो काढून नंतर प प्रियकराला पोलीसओलीस ठेवून प्रियसीवर बलात्कार केलं दावा करण्यात येत आहे.
13 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासह निर्जन ठिकाणी असताना तिच्यावर बलात्काराची ही लाजिरवाणी घटना घडली आहे. या प्रेमी युगुलाचा पाठलाग करणाऱ्या चार नराधमांनी पोलिस असल्याचं खोटं सांगून आधी दोघांचा फोटो काढला आणि नंतर प्रियकराला ओलिस करून प्रेयसीला घाबरवलं. त्यानंतर प्रियकराच्या समोरच प्रेयसीला झुडपात नेऊन एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे या घटने नंतर या गुन्हेगारांनी आपला मोबाईल क्रमांकही दिला. कोणतीच भीती बाळगू नका मी स्वतः पोलिसात असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास जाऊन काही फायदा होणार नाही, अशी भीती आरोपीने जोडप्याला दाखवली.
काय आहे घटना….
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार,बुधवारी संध्याकाळी ती तिच्या प्रियकरासोबत एकांतात बसली होती. यावेळी दोन दुचाकींवरुन चौघे जण तिथे आले. यांनी आमचे मोबाईलमध्ये फोटो काढला, पोलीस असल्याचे सांगून दोघांना धमकवण्यास सुरुवात केली. या चार तरुणांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेण्याची धमकी दिली. नंतर त्यांनी पीडितेचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. प्रियकराने विरोध केल्यावर त्यांनी त्याला पकडून ठेवले.
नंतर तिच्या प्रियकराला ओलीस ठेवून बलात्काराची केला,यानंतर एका तरुणाने जवळच्या झाडीत नेऊन बलात्कार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. मात्र, पीडितेच्या वडिलांनी 4 जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, तर पीडितेने मात्र एकानेच बलात्कार केल्याचा उल्लेख केला आहे. या घटनेवेळी चौघे जण उपस्थित होते, असेही तिचे म्हणणे आहे. पीडितेने असेही सांगितले की, या घटनेनंतर तिला जीव द्यायचा होता, आणि ती घरातून निघून गेली होती. पण, शहापूर भागात एका वाटसरूने तिला घरात आसरा दिला. यानंतर पोलिसांना आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरु करत पीडितेच्या प्रियकरालाही अटक केली. पोलिसांनी 4 गुन्हेगारांपैकी एकाची ओळख पटवली आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरालाही ताब्यात घेतले आहे.