धरणगाव : प्रातिनिधी
शहरातील पारधी वाड्यात एका दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून रोख रक्कम व दागिन्यांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पारधी वाडा येथे एकाचवेळी तीन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. याबाबत मधुकर एकनाथ दाभाडे (पारधी वाडा, धरणगाव) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात दोन ते तीन जण घरात घुसले. यावेळी चोरट्यांनी घरातील आई, वडील व मुलगा हे झोपले असताना रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केले. लोखंडी कपाटातील 20 हजार रुपयांची रोकड, चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल लांबवला. याच परिसरातील इतर दोन ठिकाणी चोरी केली परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.


