मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे.
ठाण्यातील वसंत विहार परिसरात अक्षय ठुबे राहत होता. अक्षय ठुबे याच्याकडे शिवसेना शिंदे गटाचा उपशाखा प्रमुख पदाची जबाबदारी होती.अक्षय 29 तारखेपासून गायब होता, तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. त्यानंतर काल रात्री त्याचा मृतदेह सापडला आहे. आर्थिक देवाणघेवाण यातून ही हत्या झाल्याचं समोर आले आहे. ठाण्यातील चीतळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.