अ’ ब , वर्ग नगरपरिषदेसाठी-2 ने सदस्यसंख्येत वाढ तर क वर्ग नगर पालिकेच्या संख्येत 3 ने वाढ
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याबाबतचे आदेश आज जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.अ’ ब , वर्ग नगरपरिषदेसाठी-2 ने सदस्यसंख्येत वाढ झाली असली तरी तर क वर्ग नगर पालिकेच्या संख्येत 3 ने वाढ केली आहे तर अ वर्ग नगर पालिकेत किमान सदस्य संख्या 40 असेल आणि 75 पेक्षा अधिक नसेल,व ब नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेलआणि 37 पेक्षा अधिक नसेल ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल.
राज्यातील यापूर्वी मुदत समाप्त झालेल्या व माहे
डिसेंबर, 2021 ते फेब्रुवारी, 2022 या कालावधीत मुदत समाप्त होणाऱ्या अ ब व क वर्गातील नगरपरिषदांची जी प्रभाग रचना शासनाच्या दि.01ऑक्टोबर, 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनुसार(बहुसदस्यीय प्रभाग पध्दती नुसार तयार करून ठेवण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 3 अन्वये सर्व पालिका प्रशासनास आधीच कळविण्यात आले होते.
राज्य शासनाने सन 2021 चा महारष्ट्र अध्यादेश क्रमांक 10/2021 दि.02 नोव्हेंबर, 2021 रोजी प्राध्यापित केला असून “अ’ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे.
तसेच ‘अ’ वर्ग नगरपरिषदेमध्ये किमान सदस्य संख्या 40 असेल आणि 75 पेक्षा अधिक नसेल, “ब वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे.
“ब” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेल आणि 37 पेक्षा अधिक नसेल ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 3 ने वाढ केली आहे. त्यानुसार “क” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल.शासनाच्या दि. 2 नोव्हेंबर, 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनुसार उपरोक्त परिच्छेद क्रमांक 2 मध्ये नमूद केल्यानुसार सदस्य संख्या निश्चित करून त्यानुसार प्रभाग रचना कोणत्याही परिस्थीत 30/11/2021 पूर्वी तयार करून ठेवावी व राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.
धरणगाव पालिकेत एका प्रभागासह वाढणार तीन नगरसेवक राज्य शासनाने सन 2021 चा महारष्ट्र अध्यादेश क्रमांक 10/2021 दि.02 नोव्हेंबर, 2021 रोजी प्राध्यापित केला असून “अ’ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे.
“क” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसणार. त्यानुसार धरणगाव नगरपालिकेत एक प्रभाग आणि तीन नगरसेवक वाढणार आहे. तसेच या गोष्टीचा परिणाम प्रभाग रचना तसेच आरक्षणावर देखील होणार असल्याचे बोलले जात आहे.