जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून असलेला अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याने मंगळवारी बॅरेकमध्ये रुमालाच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. इतर बंदिवानांनी त्याला वाचवत खाली उतरविले. सोनवणे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
खुनाच्या गुन्ह्यात अमोल सोनवणे हा २६ ऑगस्ट २०२१पासून जिल्हा कारागृहातील कोविड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे. दि. २९ रोजी रात्री अचानक कोविड बॅरेकमधील बंदिवानांचा आरडाओरड चालू झाला. त्यामुळे या सर्व जणांनी धाव घेतली. यावेळी बॅरेकमधील बंदी अमोल हा रुमालाने कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेतलेला दिसला.