• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून दोन चारचाकी चोरट्यांना पोलिसांनी केली अटक !

editor desk by editor desk
August 30, 2023
in क्राईम
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगावसह कुसूंबा येथील कार चोरट्यांना रामानंद पोलिसांनी अटक केली आहे. विशाल संजय सपकाळे (21, रा.कुसुंबा, जि.जळगाव) आणि वैभव महेंद्र बारी (21, रा.खंडेराव नगर, जळगाव) अशा अटकेतील संशयितांची नावे आहे असून त्यांच्याकडून चोरी केलेली कार जप्त करण्यात आली.

जळगाव शहरातील शिव कॉलनी परीसरात राहणारे रवींद्र हरी पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस त्यांच्या मालकीची इंडिका कार क्रमांक (एमएच 19 एपी 3860) ही 6 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी विशाल संजय सपकाळे (21, रा. कुसुंबा, ता.जि.जळगाव) आणि वैभव महेंद्र बारी (21, रा.खंडेराव नगर, जळगाव) या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. पोलीसांनी खाक्या दाखवताच दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी ही चोरी इतर दोन जणांच्या मदतीने केली असल्याचे देखील सांगितले. त्यांच्याकडून चोरीला गेलेली कार ही पोलिसांनी हस्तगत केली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, राजेश चव्हाण, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, उमेश पवार यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत असून कार चोरीचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Tags: #jalgaon#policechori
Previous Post

एकतर्फी प्रेमातून सतत पाठलाग अन मुलीच्या आईला दिली धमकी !

Next Post

कारागृह प्रशासनात खळबळ : जळगाव कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

Next Post
कारागृह प्रशासनात खळबळ : जळगाव कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

कारागृह प्रशासनात खळबळ : जळगाव कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group