मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी तबब्ल ६९३९ जागांची भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ अंतर्गत भरल्या जाणाऱ्या विविध पदांची नावे, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदांची नावे –
ग्रहवस्त्रपाल, वस्त्रपाल, भंडार नि वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ECG तंत्रज्ञ, दंतयांत्रिकी, दंतआरोग्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी अन्वेषक, अधिपरिचारिका, कार्यदेशक, अधिपरिचारिका, सेवा अभियंता, दूरध्वनीचालक, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, वाहन चालक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, शिंपी, उच्च श्रेणी लघुलेखक, वार्डन/ गृहपाल, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपिक, वीजतंत्री, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ (HEMR), कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR), नळ कारागीर, निम्म श्रेणी लघुलेखक, सुतार लघु टंकलेखक, नेत्र चिकित्सा अधिकारी क्ष किरण सहाय्यक, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, ECG तंत्रज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, शस्त्रक्रिया शस्त्रगृह सहाय्यक, व्यवसोपचार तज्ञ, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ/ पेशी तंत्रज्ञ, सामोपदेष्टा, मोल्डरूम तंत्रज्ञ/ किरणेपचार तंत्रज्ञ, रासायनिक सहाय्यक, पेशी तज्ञ, अणुजीव सहा-/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परफयुजिनीष्ट, अवैद्यकीय सहाय्यक, ग्रंथपाल.
शैक्षणिक पात्रता –
१० वी/ १२ वी पास/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/ B.Sc/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/ B.Pharm/ M.Pharm/ GNM/ B.Sc (नर्सिंग)/ वाहनचालक परवाना/ इलेक्ट्रिशियन/ कुशल कारागिर/ टेलर/ कारपेंटर विषयात ITI/ B.Sc.(Hon)/ ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा/ मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ १० वी पास + मराठी आणि इंग्रजी टायपिंग.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १००० रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ आदुघ – ९०० रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २९ ऑगस्ट २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२३