Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिस्तुल घेवून फिरणारा ‘माया’ पोलिसांच्या ताब्यात !
    क्राईम

    पिस्तुल घेवून फिरणारा ‘माया’ पोलिसांच्या ताब्यात !

    editor deskBy editor deskAugust 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

     

    जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांच्या नाका बंदी दरम्यान गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला मुक्ताईनगर पोलिसांनी पकडले असून त्याला गावठी पिस्तूल देणाऱ्या अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास नाकाबंदी करत असतांना पोलिसांना रवींद्र उर्फ माया तायडे हा तरूण गावठी कट्टयासह आढळून आला. त्याची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तायडे याची चौकशी केली असता त्याने नशिराबाद येथील युवराज कडू होंडाळे याच्याकडून १९ हजार रूपयात हा कट्टा खरेदी केल्याची माहिती दिली. यासाठी मुक्ताईनगर येथील मयूर विजयसिंग राजपूत याचा फोन पे क्रमांक वापरल्याचेही त्याने सांगितले.

     

    या माहितीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात रवींद्र उर्फ माया तायडे, युवराज कडू होंडाळे व मयूर विजयसिंग राजपूत या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तायडे आणि होंडाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. प्रदीप शेवाळे ,पो.उप.निरी. राहुल बोरकर , पोहेकॉ लिलाधर भोई ,पोना धमंद्र ठाकुर, पोना/ मोतीलाल बोरसे चापोना/ सुरेश पाटील , रविंद्र धनगर , प्रशांत चौधरी , राहल बेहनवाल यांच्या पथकाने केली आहे.

    #police Gavathi pistul Man arrest muktainagar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.