• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीसह महिलेला दुधाच्या गाडीने फेकले नाल्यात !

editor desk by editor desk
August 30, 2023
in क्राईम, जळगाव
0
दुचाकीसह महिलेला दुधाच्या गाडीने फेकले नाल्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील अपघाताची मालिका नियमित सुरु असून पुन्हा एकदा जळगाव शहरात अपघात झाला आहे. शहरात दुधाचे कॅरेट उतरविल्यानंतर दूधवाटप करण्यासाठी निघालेल्या वाहनाचे अॅक्सिलेटर अडकल्याने अनियंत्रित झालेल्या या वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला पूजा वासुदेव तलरेजा (वय ४८) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी मासूमवाडीतील डायमंड हॉलजवळ घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीतील पूजा तलरेजा या दुचाकीवरून मासूमवाडीकडे जात होत्या, तर महामार्गावरून दुधाचे वाहन (एमएच ०५ आर ७५८०) दूधवाटप करून तुकारामवाडीकडे जात होते. एका दुकानावर दुधाचे कॅरेट उतरविल्यानंतर चालक वाहन घेऊन पुढे जात होता. यावेळी वाहनाचे अॅक्सिलेटर लॉक झाले. यामुळे वेगाने हे वाहन समोरून येत असलेल्या पूजा तलरेजा यांच्या दुचाकीला धडकले. ही धडक इतकी जोरात होती की, महिला रस्त्यावर फेकली गेली, त्यांची दुचाकी आणि दुधाचे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीत उलटले. त्याआधी त्याने रस्त्यावर उभ्या इतर वाहनांनाही धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या तलरेजा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी योगेश बारी व गोविंदा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.

Tags: #accident#jalgaon
Previous Post

राष्ट्रवादीच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी ॲड.रोहिणी खडसे !

Next Post

जळगावात भरधाव चारचाकीने दिली ट्रकला धडक ! 

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगावात भरधाव चारचाकीने दिली ट्रकला धडक ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group