जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात आज सकाळी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या जीर्ण इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या घरातून तीन जण सुदैवाने बाहेर पाडण्यात यशस्वी झाले होते. पण या घटनेत एक वृद्ध महिला इमारतीत अडकल्याने मनपा प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. पण दुर्देवाने या पथकाला अपयश आले असून यात ७५ वर्षीय वृद्ध राजश्री सुरेश पाठक यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील इमारतीचे मालक पाठक हे सकाळच्या सुमारास पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. आज देखील मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान सकाळी साडेआठ वाजता अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाक बचाव कार्य सुरू केले. यात तीन जणांना वाचविण्यात यश आलं. तर एक जयश्री पाठक या वृध्द महिला इमारतीच्या ठिगाऱ्याखाली अडकल्या. त्यांना वाचवण्यासाठी ही प्रशासनाचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जयश्री पाठक यांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.