• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या  पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 19, 2021
in जळगाव, राजकारण
0
जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या  पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

21‍ डिसेंबर रोजी होणार मतदान

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्ह्यातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या 162 ग्रामपंचायतीमधील 229 जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.


ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार, 22 नोव्हेंबर, 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी  30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)  ते 6 डिसेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.

मंगळवार, 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार, 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल तर बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना सोमवार, 27 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

रिक्त सदस्य पदांसाठी 12 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली असून सदरची मतदार यादी 18 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींमध्येही प्रसिध्दी केली आहे. जिल्ह्यात पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

Previous Post

जळगावातील कारागृहात कैद्यांमध्ये फ्री स्टाईल
हाणामारी

Next Post

बुलेट चोरी करणाऱ्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next Post
बुलेट चोरी करणाऱ्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बुलेट चोरी करणाऱ्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group