चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वालझिरी येथे मुख्य महादेवाच्या मंदिरातून एका 55 वर्ष वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एका महिलेने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण सोमवार निमित्त चाळीसगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वालझीरी येथे दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील दिघी येथील निर्मलाबाई बारकू परदेशी या दर्शनासाठी गेले असता. त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराजवळ भाविकांच्या गर्दीचा असल्याचा फायदा घेत एका महिलेने त्यांचे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दहा ग्रॅम वजनाचे लंपास केल्याचे घटना समजतात त्यांनी लागले चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात धाव घेत त्या संशयित महिलेविरोधात करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार ओंकार सुतार हे करीत आहे