• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तीन भोंदू बाबांनी सासू-सुनेला धागा दिल्यावर बसला फटका !

editor desk by editor desk
August 28, 2023
in क्राईम
0
तीन भोंदू बाबांनी सासू-सुनेला धागा दिल्यावर बसला फटका !

नागपूर : वृत्तसंस्था

 

नागपूरला राज्याची उपराजधानी म्हटले जाते. नागपूरची आता क्राईम सिटी अशी ओळख बनत चालली आहे. जेष्ठ नागरिक, घरात एकट्या महिलांना गाठून लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. अशी एक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. तीन भोंदू बाबांनी सासू-सुनेला लुटल्याची घटना घडली आहे. पालखीसाठी पैसे मागत त्यांना धागा दिला आणि महिलांना बेशुद्ध करून त्यांचं मंगळसूत्र घेऊन पळ काढला. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या तिन्ही चोरट्यांचा पोलिसांनी काही तासातच शोध घेतला. मात्र यांनी त्या धाग्याला कुठला द्रव लावला होता, त्यामुळे या महिला बेहोश झाल्या याचा शोध पोलीस घेत आहे.

नेमक घडल काय ?

नागपूरच्या यशोधरा नगर परिसरातील धम्मदीप नगरमध्ये सासू आणि सून आपल्या घरी बसल्या होत्या. यावेळी तिथे तीन जन हातात झेंडा घेऊन आले. पालखीला जात आहोत, काही दान करा अशी विनवणी त्यांनी केली. म्हणून सूनबाईने त्यांना दहा रुपये दिले. मग त्यांनी प्यायला पाणी मागितलं. महिलेने त्यांना पाणी दिलं. पाणी प्यायल्यानंतर त्यांनी दोघींच्या हातात एक धागा बांधला. धागा बांधल्यानंतर थोड्याच वेळात दोघीही बेशुद्ध झाल्या. सासू-सून बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढत पळ काढला. महिलेचा मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा आई आणि पत्नी दोघीही बेशुद्ध पडलेल्या दिसल्या. त्याने त्यांच्या तोंडावर पाणी झिडकत उठवलं. यानंतर त्यांनी सर्व घडला प्रकार कथन केला. मुलाने लगेच पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर माहिती घेत चोरट्यांचा शोध सुरु केला. अखेर कळमेश्वर येथून तिन्ही आरोपींना अटक केली.

Tags: #policeBhondu babaCrime
Previous Post

सोन्यासह रोकड केली होती लंपास अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post

दोन्ही गुलाबराव पुन्हा भिडले ; जळगाव ग्रामीणचे राजकारण तापले !

Next Post
दोन्ही गुलाबराव पुन्हा भिडले ; जळगाव ग्रामीणचे राजकारण तापले !

दोन्ही गुलाबराव पुन्हा भिडले ; जळगाव ग्रामीणचे राजकारण तापले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group