Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोन्यासह रोकड केली होती लंपास अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    सोन्यासह रोकड केली होती लंपास अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskAugust 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील तांबापुरा भागात पटेल गल्ली येथे राहणारी वयोवृध्द महीला तसलीमबी मोहम्मद सैय्यद, वय 60 वर्षे, या बकरी ईद सणानिमीत्त धुळे येथे त्यांच्या मुलीकडे दिनांक २६ जून पासून ते दिनांक ८ जुलै दरम्यान गेलेल्या असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घराचा कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करुन २३ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व २५ हजारांची रोकड असा एकुण ४८ हजारांचा किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर बाबतीत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिनांक ८ जुलै रोजी एम. आय. डी. सी. पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व गुन्हयातील गेल्या मालाचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो. यांना गुप्त बातमी मिळाली कि, सदरची घरफोडी चोरी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली याने त्याचे साथीदारांसह मिळुन केलेली असुन सदरचा आरोपी हा सुरत येथे लपुन बसलेला आहे. म्हणुन पोलीस निरीक्षक सो. यांचे मार्गदर्शनखाली पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, छगन तायडे अशांचे पथक सुरत येथे रवाना करुन सदर पथकाने आरोपी इश्तीयाक अली राजीक अली यास ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचे साथीदार 1) हसीनाबी राजीक अली, वय 55 वर्ष, रा. शाह अवलीया मशीद जवळ, तांबापुरा, जळगाव, 2) अनिस हमीद शेख, वय 31 वर्ष, रा. रुबी अपार्टमेंट, प्लॅट नं. 04, डी. मार्ट जवळ, शिरसोली नाक्याजवळ, जळगाव व एक विधी संर्घष बालक अशांना तांबापुरा भागातुन अटक करण्यात आली असुन त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यांचे कडुन गुन्हयातील गेल्या मालापैकी 1) 5,000/- रु रोख, 2 ) 5,000/- रु किंमतीचे 100 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पायातील साखळ्यांचा जोड, 3) 3) 12,000/- रु किंमतीची 04 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकुण 22,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीतांकडुन अजुन चोरी, घरफोडी उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरी. दिपक जगदाळे, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, अल्ताफ पठाण, सचिन मुंढे, मुकेश पाटील, छगन तायडे, योगेश बारी अशांनी केली आहे.

    #jalgaon #police Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.