नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणे अनेक उघडकीस येत आहे. त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली असून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना नागपूर शहरातील आंबेडकरनगरात रविवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
प्रणाली ललित दहाट (३४) असे मृत महिलेचे नाव आहे, तर ललित रामदास दहाट (३८) असे आरोपीचे नाव आहे. सहा वर्षांपूर्वी दोघांनी मंदिरात लग्न केले. लग्नानंतर ललित प्रणालीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरून वाद व्हायचे. अशाच वादातून आरोपीने गळा चिरून प्रणालीची हत्या केली. माहेरी गेलेली पत्नी परतल्यानंतर त्याने हे कृत्य केले. त्यानंतर घराला कुलूप लावून तो फरार झाला. ललित आणि प्रणाली यांचे हे दुसरे लग्न आहे. दोघांनीही आपल्या पती आणि पत्नीला सोडून प्रेमविवाह केला होता.