प्रतिनिधी पाळधी : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व त्यांच्या पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे त्यांच्या मतदारसंघात कामाचा धडाका सुरूच आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात पालकमंत्री पाटील यांचा गण दौरे सध्या सुरू आहे. नागरीकांच्या समस्या त्यांच्या गावोगावी जाऊन सोडवण्याचे काम सुरू आहे. बांभोरी- चांदसर जिल्हा परिषद गटाची बैठक धार गावात झाली. यावेळी झालेल्या गण दौऱ्यात गावातील विकास कामांबाबत माहिती जाणून घेण्यात आली. या गटात सर्वात मोठी समस्या ही शेत रस्त्यांची होती. यासाठी मंत्री महोदयांनी स्व:खर्चातून महिन्याभरातून रस्ता केला. सात किलो मीटरचा रस्त्यासाठी घरची मशिनरी लावून डिझेलसाठी सात लाख रुपये खर्चून केला.
यासोबतच प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी असा मानस असल्याने तालुक्यात जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी स्मशानभूमी तयार केली तर तीन गावात जागा न मिळाल्याने काम बाकी आहे मात्र यावर देखील लवकरच तोडगा काढत स्म्शानभूमी तयार करण्यात येईल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील नागरीकांना दिला. कार्यक्रमास जिल्हाप्रमुख माजी पंचायत समिती सभापती सचिन पवार, मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, पाळधी सरपंच शरद कोळी, वंजारी सरपंच गणेश महाजन, बांभोरी उपसरपंच भिकन नन्नवरे, सरपंच सचिन भाऊ, धार येथील सरपंच मिलिंद भाऊ, भास्कर भाऊ, शेरी येथील दादाभाऊ कोळी, आबा पाटील, सुधाकर पाटील, झुरखेडा येथील ज्ञानेश्वर सोनवणे, दोनगाव बुद्रुक अमोल पाटील,किशोर राघो, दोन खुर्द माजी सभापती भागवत शेठ, कवठळ मिलिंद भाऊ, चोरगाव येथील नानाभाऊ कोळी, रेल येथील नरेंद्र भाऊ पाटील, लाडली येथील गजानन पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक भदाणे, युवा सेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी, आव्हानी किरण आबा, फुलपाट दत्तू पाटील, नाना भोई, टहाकळी येथील मधु भाऊ, अशोक नाना, किरण भाऊ, पोखरी येथील नवल भाऊ, गोकुळ भाऊ, विभाग प्रमुख गोकुळ लंके, माजी उपसभापती रवींद्र शेठ, बांभोरी ईश्वर शेठ नन्नवरे, पथराड बुद्रुक शरद शिंदे, अमृत चाफे, भूषण शिंदे, पथराड खुर्द श्रीकांत चव्हाण व मान्यवर उपस्थित होते.


