जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र योगा असोशिएशन व जळगाव जिल्हा योगा असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव येथे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन दिपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन डिवायएसपी अप्पासो पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी राज्य संघटनेचे चेअरमन चद्रंकात पांगारे राज्य सचीव जतीन सोलंकी, पोलीस उपनिरिक्षक तुषार मिस्तरी, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेद्र मराठे, प्रा शिवराज माणके, सुमन रहाणे, डॉ.अनिता पाटील, अक्षय सोनवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते राज्यभरातुन 419 खेळाडु सहभागी झाले असुन या स्पर्धेतुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे सुत्रसंचलन प्रविण पाटील यांनी केले स्पर्धेत पंच म्हणुन विद्या महाले चेतन वाघ धनश्री लेकुरवाळे माधुरी मेघे चैताली साळवे अनिता गायकवाड हे काम पाहत आहेत