मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सत्तेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर अनेक राजकीय पक्षातून त्यांच्यावर टीकास्त्र सुरु झाले आहे तर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवारांवर वक्तव्य केले आहे.
विनायक राऊत म्हणाले कि, अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठीच इकडे आलेत, त्यांनी आतापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची बळकवायला सुरुवात केली आहे. मंत्रालयातील वार रूमदेखील त्यांनी ताब्यात घेतली आहे, पाठीत खंजीर खुपसून शिवसेना पक्ष फोडणार्या सर्व गद्दारांचे येणार्या निवडणुकीत गोदावरी नदीत विसर्जन करण्यासाठी हिंगोलीची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा महत्वाची असणार असून, पक्षाच्या गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी ही सभा ऐतिहासिक करा, असे आवाहनही शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.
अजित पवार आणि त्यांचे सहकारी जेव्हापासून भाजपसोबत सत्तेत सामील झाले, तेव्हापासून अजित पवार मुख्यमंत्री होण्याचा चर्चांना उधाण आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्चीही धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर भाष्य करत शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच शिंदे यांच्यावर हात वारे करून टीकाही केल्याने पुन्हा एकदा शिंदे- ठाकरे गटाचा संघर्षात ठिगणी पडणार असल्याचे दिसत आहे.
नायक राऊत म्हणाले की, बीआरएस हा तेलंगणातील पक्ष महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात फिरत असून, भारतीय जनता पक्षाची ही बी टिम आहे. महाराष्ट्र एकसंघ रहावा हे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ध्यास आहे, मात्र बीआरएसच्या माध्यमातून मराठवाड्याचा काही भाग तेलंगणाला तसेच चंद्रपूरचा भाग तेलंगणाला जोडून तसेच कोकणचा भाग गोव्याला जोडून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे त्यांचे मनसुबे शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


