धरणगाव( लक्ष्मण पाटील) सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमची पाकिटं आढळून आल्यानंतर या ठिकाणी वासनाकांड घडलंय का?, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी आज पालिका प्रशासनने ती खोली बंद केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, सोनवद रोडवरील स्मशाभभूमीत एका खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबर प्लेट आढळून आल्या होत्या.
मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी या प्रकरणाची गंभीर घेत आज त्या खोलीचा अखेर आज दरवाजे बंद करण्यात आले आहे. या स्मशानभूमीच्या देखरेखीचे काम दिले होते. त्या मक्तेदाराला १६ तारखेला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच त्यांनाच याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. दरम्यान, मक्तेदाराने या प्रकरणी दिरंगाई केल्यास त्याच्याच विरुद्ध पालिका गुन्हा दाखल करेल, असा सज्जड इशारा देखील मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दिला आहे.
हिंदू धर्मामध्ये अंत्यविधी हा सर्वात महत्वाचा भाग आहे,हा विषय भावनिक असतो,त्यासाठी गावाबाहेर स्मशानभूमी असते मात्र त्याठिकाणी गावगुंडांनी घाण करून ठेवली आहे. त्याठिकाणी असलेल्या रूम मध्ये नको त्या वस्तू आढळल्याने या गावगुंडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरवाजे बंद केले म्हणजे झाले असे होऊ नये, पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी नगर पालिकेने बंदोबस्त करावा व गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.