धरणगाव लक्ष्मण पाटील:- धरणगाव शिवसेनेतर्फे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत तथा हिंदुरुदय सम्राट मा.वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ यांनी मा.बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भूतकाळातील काही घटनांना आज उजाळा देत आपल्या भावनांना वाट मोकळी केली,या प्रसंगी सांगताना ते म्हणाले की माझ्या आयुष्यात आज मी जे सर्वकाही आहे ते वंदनीय बाळासाहेबांमुळेच आहे. तसेच माझ्या आयुष्यात त्यांना भेटण्याचे बरेचसे प्रसंग आले परंतु एक प्रसंग असा होता की ते अगदी माझ्या जवळ म्हणजे मांडीला मांडी लावून बसले होते आणि त्यांचा हात माझ्या पाठीवर असताना मला जो अभिमान वाटत होता त्याला मी आज पोरका झालो आहे. असे म्हणून त्यांना आपले अश्रू अनावर झाले. तसेच धरणगाव नगरीचे लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष भाऊसो निलेश भाऊ चौधरी,उपजिल्हा प्रमुख श्री.पी एम पाटील सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून वंदनीय बाळासाहेबांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच धरणगाव काँग्रेसचे मा.डी जी पाटील साहेब यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी एक प्रसंग सांगितला की महाराष्ट्रात मराठी माणसाला असा काळ आला होता की भैय्या लोकांनी जगणे मुश्कील केले होते किंवा व्यवसाय अशा प्रसंगी धीरोदात्त बाळासाहेबांनी बजाव पुंगी हटाव लुगीं चा नारा देत अखिल मराठी अस्मितेला जागे करत संबंध महाराष्ट्रात एक चैतन्याची लहर निर्माण केली होती त्यामुळे आज मुंबईमध्ये व संबंध महाराष्ट्रात मराठी माणूस ताठ मानेने जगू शकतो किंवा व्यवसाय करून आपले चरितार्थ चालवू शकत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहील यात दुमत नाही.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी,माजी नगराध्यक्षा सौ उषाताई वाघ,सौ माजी नगराध्यक्षा सौ अंजली विसावे,माजी प्रभारी नगराध्यक्षा सौ कल्पना महाजन,सौ रतना धनगर,सौ भारती चौधरी,सौ सुनिता चौधरी,जिवन आप्पा बयस,शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र महाजन,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे,शिवसेना गटनेते पप्पु भावे,वासुदेव चौधरी,अहमद पठाण,जितेंद्र धनगर,सुरेश महाजन,भागवत आप्पा चौधरी,किरण मराठे,संजू चौधरी,नंदू पाटील,सी के पाटील, अरविंद देवरे,दिपक वाघमारे,राजेंद्र न्हायदे,रतिलाल चौधरी,महेश पवार,डी ओ पाटील,तौसिफ पटेल,बापू जाधव,विजय शुक्ला,बाळू जाधव,आबा वाघ,धीरेंद्र पुर्भे,संतोष महाजन,राहुल रोकडे,प्रकाश पाटील,सतीष बोरसे,नगराज पाटील,किरण अग्निहोत्री, कमलेश बोरसे,छोटू जाधव,दिनेश येवले,प्रशांत वाणी,योगेश पी पाटील,डी जे पाटील,चेतन जाधव,धर्मराज मोरे,बुट्या भाऊ पाटील,हेमंत चौधरी,रवींद्र जाधव,आप्पा पारेराव,योगेश महाजन,अविनाश चौधरी,कालू उस्ताद,महमूद पठान,गुलाब महाजन,देवा महाजन,राजु चौधरी,भिमा धनगर,करण वाघरे,पापा वाघरे, भैया भाऊ महाजन,बापू महाजन,विनोद रोकडे,अरविंद्र चौधरी,गोलू चौधरी आदी उपस्थित होते.