• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कोयत्याने ३७ वार करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने ठोकली शिक्षा !

editor desk by editor desk
August 25, 2023
in क्राईम
0
कोयत्याने ३७ वार करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने ठोकली शिक्षा !

पुणे : वृत्तसंस्था

 

राज्याला हादरा देणारी घटना पुणे शहरात २०१० मध्ये घडली होती. या घटनेत एका युवकावर तब्बल ३७ वार कोयत्याने करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनवाणी झाली. अखेर या खटल्याचा निकाल आला आहे. पुणे न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.

 

पुणे येथे 21 नोव्हेंबर 2010 मध्ये राकेश नामदेव घुले (वय २५, रा. बोपखेल) यांचा खून करण्यात आला होता. हा खून पूर्व वैमनस्यातून झाला होता. तर यापूर्वी मार्च 2010 मध्ये राकेश घुले यांनी यातील आरोपींवर हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी राकेश घुले यांचा हल्ला करण्यात आला. हैदर जावेद सय्यद (वय १८), विक्रम ऊर्फ विक्की नंदू बिहारी (वय २१), साजीश अशोक कुरवत (तिघेही रा. काळेवाडी) आणि अविनाश गौतम बनसोडे (वय १८, बोपखेल) या आरोपींना कोयत्याने राकेश घुले याच्यावर वार केले होते. काळेवाडीतील हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. तब्बल 37 वार झाल्यामुळे राकेश घुले याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी हैदर जावेद सय्यद, विक्रम ऊर्फ विक्की नंदू बिहारी, साजीश अशोक कुरवत आणि अविनाश गौतम बनसोडे यांना अटक केली. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालला. साक्षी, पुराव्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्या. जाधव यांनी निकाल दिला. या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. तसेच प्रत्येक आरोपींना दोन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हैदर जावेद सय्यद, विक्रम ऊर्फ विक्की नंदू बिहारी, साजीश अशोक कुरवत आणि अविनाश गौतम बनसोडे हे चौघेही सप्टेंबर 2012 पासून 16 फेब्रुवारी 2019 पर्यंत कारागृहात होते. आरोपींना केलेल्या दंडाच्या रकमेतून पाच लाख रुपये राकेश घुले यांच्या कुटुंबियांना भरपाई म्हणून द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.

Tags: #policeCrimenyayalay
Previous Post

दवाखान्यात दरोड्याचा प्रयत्न : महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल !

Next Post

ऑनलाइन गेममध्ये हरला अन पोलिसांना बसला धक्का !

Next Post
ऑनलाइन गेममध्ये हरला अन पोलिसांना बसला धक्का !

ऑनलाइन गेममध्ये हरला अन पोलिसांना बसला धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group