अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरातील एका मेडिकल फाउंडेशनच्या दवाखान्यात एका महिलेसह पाच अनोळखी लोकांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंमळनेर पोलीस स्थानकात महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरातील नर्मदा मेडिकल फाउंडेशन या दवाखान्यात दिनांक २३ ऑगस्ट रोजी एका महिलेने दवाखान्यांमध्ये येत मोफत उपचार करावेत तसेच आम्ही दिलेले पैसे परत करावेत तसेच आम्हाला आत्ताच्या आत्ता दहा हजार रुपये द्यावेत जर पैसे दिले नाही तर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून व जीवे ठार मारू अशी धमकी देऊन ही मागणी केली असता साक्षीदाराने नकार दिल्याने डॉक्टरांच्या टेबल मधील ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर बीपी ऑपरेटरचा लोखंडी स्टॅन्ड उचलून डॉक्टरांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केल्याने व संतापाच्या भरात लोखंडी खुर्च्या उचलून पेशंटच्या ड्रेसिंग टेबलचा काच देखील यावेळी फोडण्यात आला आहे याप्रकरणी दवाखान्यातील डॉक्टर हर्षल देवदत्त संदनशिव यांच्या तक्रारीवरून एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.