Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात दरोड्याच्या उद्देशान आलेल्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    जिल्ह्यात दरोड्याच्या उद्देशान आलेल्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskAugust 25, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

    दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री आठ वा. चे सुमारास एका पांढऱ्या रंगाची इस्टींगा गाडीने सात आठ पुरुष हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर शहराकडेस येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलीस निरीक्षक मोहीते यांनी नाकाबंदीस असलेले पो. उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोहेकॉ / 1303 विनोद सोनवणे, पोहेकॉ/2881 संदिप खंडारे, पोना/3100 धर्मेंद्र ठाकुर, पोना / 2991 संदीप वानखेडे, पोका 49 राहुल बेहनवाल, पोकों/ 62 संदिप धनगर, पोकों / 189 रविंद्र धनगर, पोकां/ 3225 मंगल सोळंके, पोकों/1543 अमोल जाधव यांना बोदवड चौफुल्ली येथे बोदवड कडुन येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्याची सुचना दिली.

    त्या प्रमाणे वरील नाकाबंदी टिमने एक पांढ-या रंगाची इस्टीगा गाडी क्र एमएच 46 ए 8521 ही गाडी थांबवली. त्यातील इसमांना पोलीस ठाणे येथे आणुन त्यांची व वाहनाची झडती घेतली असता रु.69 हजार 650 रोख रक्कम, रु. 40 हजार किमतीचा एक गावठी कट्टा, रु.1500 किमतीचे तिन जिवंत काडतुस, रु.1500 चा सुरा, रु. 6 लाख 77 हजार 750 किमतीची इस्टीगा गाडी, रु.41 हजार 500 किमतीचे 06 मोबाईल फोन, रु.50/- कि.ची. सुती दोरी, रु. 200/- कि.च्या दोन नंबर प्लेट असा एकूण सुमारे ८ लाख ३२ हजाराचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला.

    दरम्यान आरोपी 1) मुकेस फकीरा गणेश वय-42 रा. बखारी जय भिमवाडी शहापुर जि.बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश 02 ) शेख भुरा शेख वशिर वय 38 रा.शहापुर वॉर्ड क्रं. छोटा बाजार जि.बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश 03) शेख शरीफ शेख सलीम वय 35 रा. इच्छापुर बाजार गलती मशिद चे पाठीमागे जि.बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश 04) शाहरुख शहा चांद शहा वय 20 रा. आगननाका उजैन्न राज्य मध्य प्रदेश 05) अज्जु उर्फ अझरूदीन शेख अमिनुद्दीन वय 36 विरन कॉलनी 13 नंबर गल्ली अमीनपुरा बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश 06) अंकुश तुळशिराम चव्हाण वय 20रा. खापरखेडा तहसिल खकणार जि. बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश 07) खजेंदरसिंग कुलविरसिंग रिन वय 40 रा. लोधीपुरा बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश 08) शेख नईम शेख कय्युम वय 45 रा. शहापुर वॉर्ड क्रं. 5 छोटाबाजार तहसिल कार्यालय जवळ बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश यांना इसमांना अटक करुन त्यांचे विरुध्द 307/2023 भादवि कलम 399, 402 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25, मपोका कलम 37 (1) (3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. नागेश मोहिते हे करीत आहे.

    सदरची कारवाई एम. राजकुमार पोलीस अधिक्षक जळगांव, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी जळगांव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहीते, सपोनी संदिप दुनगहु, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर पोहेकाँ/1303 विनोद सोनवणे, पोहेकॉ/2881 संदिप खंडारे, पोना / 3100 धर्मेंद्र ठाकुर, पोना/2991 संदीप वानखेडे, पोकॉ/49 राहुल बेहनवाल, पोकों/ 62 संदिप धनगर, पोकों/ 189 रविंद्र धनगर, पोकॉ/3225 मंगल सोळंके, पोकों / 1543 अमोल जाधव यांनी केलेली आहे.

    #police muktainagar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.