चाळीसगाव : प्रतिनिधी
नांदगावकडून धुळेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने वयोवृद्धाला जोरदार धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अशोक शांताराम मराठे (वय-६५) हे चाळीसगावला एका हॉटेलात कामाला आहे. मात्र काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मराठे हे रस्ता ओलांडताना अचानक टाटा कंपनीच्या भरधाव ट्रकने (क्र. एम.एच. आर.जे ११ जीसी ०५१३) त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी त्यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु अपघात घडताच चालक वाहनांसह पसार झाला. सदर अपघात हे खडकी बायपासला घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी हॉटेल व्यावसायिक यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना राकेश पाटील करीत आहे.