मुंबई : वृत्तसंस्था
संपूर्ण भारतात चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्याने सर्वच आनंद साजरा करीत असतांना अनेक नेत्यांनी चांद्रयान-3 लँडिंग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. अनेकांनी या यशाचं श्रेय शास्त्रज्ञांना दिलं. तर नेत्यांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ दिसून आली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली.
चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताचा तिरंगा झेडा आणि चांद्रयानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या तिरंगा झेंड्यांच्या फोटोवरून मिटकरी यांनी भिडेंना टोला लगावला. मिटकरी यांनी ट्विट करून म्हटलं की, “मनु” आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला…लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात… आता कसं.
गेल्या काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. या शिवाय तिरंगा झेंड्याबाबतही भिडेंनी आक्षेप नोंदवला होता. तोच धागा पकडून मिटकरी यांनी भिडेंना टोला लगावला आहे.