अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरातील नर्मदा फाऊंडेशन याठिकाणी उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बुधवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता घडली. या प्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका महिलेस १०-१२ दिवसांपासून पोट पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिने धुळे येथील एका दवाखान्यात सोनोग्राफी केली. तेथील डॉक्टरांनी तीला अपेंडिक्सचा त्रास असल्याबाबत सांगितले. यानंतर ती अमळनेर येथे आली. बुधवारी रोजी दुपारी डॉक्टरने आपला विनयभंग केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच डॉ. शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव जमला. संबंधित डॉक्टरला आमच्या ताब्यात द्या, अशी ते मागणी करत होते. डीवायएसपी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी जादा कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. गुन्हा दाखल व्हावा, म्हणून रात्री जमाव पोलीस स्टेशनसमोर थांबून होता. डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. डीवायएसीपी सुनील नंदवाळकर पुढील तपास करीत आहेत.